कॉलेजमध्ये भरलेले अनामत शुल्क 2 वर्षांत परत घ्या.

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयांत प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून अनामत रक्कम घेतली जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यापीठे, महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनाच अर्ज करण्यासारख्या तांत्रिक प्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनामत रक्कम घेतच नाहीत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठांकडे ही रक्कम पडून राहते. अशा प्रकारे अनेक वर्षांपासूनचे अनेक विद्यार्थ्यांचे अनामत शुल्काचे लाखो रुपये विद्यापीठे, महाविद्यालयांकडे पडून असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळात लोकप्रतिनिधींकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अनामत रकमेच्या विनियोगाचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम परत न घेतल्यास ही रक्कम खर्च करण्याची मुभा विद्यापीठे, महाविद्यालयांना देण्यात आली असून, ग्रंथालयीन पुस्तके, प्रयोगशाळा अद्ययावतीकरण, शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अशा कामासाठी या निधीचा वापर करता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत