चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर.

चिटफंड सुधारणा विधेयक आणि जीएसटी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आले. जीएसटी कायद्यातली ऑनलाईन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची व्याख्या, तसंच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी कायद्यात सुधारणा केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही, तसंच विरोधी पक्षानं सभात्याग केल्यावर विरोधीपक्ष नेत्यांच्या अनुपस्थितीत विधेयकं घाईगडबडीत मंजूर करून घेतल्याचं सांगत, विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत ही नाराजी व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत