महाराष्ट्रमुख्यपान

ललित पाटीलचा ताबा आता नाशिक पोलिसांकडे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने शिंदे गावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीजवर छापे टाकत येथून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत केला. अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील संशयित अक्षय नाईक वाडेला भोपाळमधून अटक केल्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य संशयित ललित पाटील याचा नाशिक पोलिस ताबा घेणार आहेत.

त्यामुळे या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

दोन महिन्यांत या गुन्ह्याची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली आणि चौदापेक्षा अधिक संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुख्य संशयित म्हणून ललित पाटील याचे नाव घेतले जाते.

२ नोव्हेंबरला पुणे पोलिसांचे पथक ललित घेऊन नाशिकला येऊन गेले. त्यानंतर ललितकडून पोलिसांनी पाच किलो सोने जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस अधिक तपासासाठी ललितला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करणार आहेत. शुक्रवारी (८) मध्यरात्री तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!