“मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय”

मनोधैर्य योजनेत सध्या असिड हल्ला किंवा बलात्कार पीडितांना १० लाखांपर्यंतची मदत दिली जाते. मात्र या योजनेतून अधिकाधिक पीडित महिलांना लाभ व्हावा यासाठी योजनेची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तत्कालीन महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार विभागाने तयार केलेल्या सुधारित योजनेत मान्यता देण्यात आली.
अॅसिडप्रमाणेच आता पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस या ज्वलनशील पदार्थांमुळे जखमी- पीडित झालेल्या महिलांनाही आता मनोधैर्य योजनेतून मदत दिली जाणार आहे. तसेच या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या योजनेसाठी एकूण सात कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अॅसिड हल्ला या गुन्ह्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांना आयुष्यात आणि समाजात पुनर्स्थापित करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत