सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी ४० कोटी विरोधी पक्षांचे आमदार मात्र वंचित

आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये प्रत्येकी ४० कोटींची तरतूद गुरुवारी केली. विरोधी पक्षांचे आमदार मात्र निधीपासून वंचित राहिले आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने सर्व समाजघटकांना खूश करण्यासाठी तब्बल ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यात सत्ताधारी आमदारांना प्रत्येकी ४० कोटींचा निधी देण्यात आला असून, विरोधी पक्षांच्या काही आमदारांनाही विकासकामांचे प्रलोभन दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुरवणी मागण्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी पाच हजार कोटी, शहरी भागात पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी पाच हजार कोटी, शेतकऱ्यांना विविध योजना आणि मदतीसाठी पाच हजार कोटी, तर राज्यातील उद्योगांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी चार हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांतील विकास कामांसाठी प्रत्येकी २५ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते आणि अन्य कामांसाठी या आमदारांना प्रत्येकी ४० कोटींचा निधी देण्यात आला आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार नाराज होऊ नयेत, या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत