राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेदरम्यान अपघातात नेमबाजास गमवावा लागला अंगठा

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी फरिदाबाद येथील रेंजवर भारतीय वायुसेनेचे पुष्पेंदर कुमार सराव करत होते. सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेदरम्यान शनिवारी झालेल्या एका अपघातात नेमबाजास डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला.
तेव्हा मुख्य टाकीतून आपल्या पिस्तूलमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला आणि त्यात पुष्पेंदर यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत त्यांना डाव्या हाताचा अंगठा गमवावा लागला आहे. त्यांचा हात मात्र सुरक्षित असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
एअर पिस्तूल आणि एअर रायफलमध्ये अगदी खालच्या बाजूला अगदी छोटासा एअर गॅस सिलिंडर जोडलेला असतो. जेव्हा नेमबाज ट्रिगर दाबतो, तेव्हा या सिलिंडरमधून गॅस सोडला जातो, जो पिस्तूलच्या आतमध्ये प्रहार करतो. त्यामुळे गोळी बाहेर पडण्यास मदत होते.
नेमबाजाला ठरावीक प्रयत्नांनंतर हा गॅस भरावाच लागतो. पूर्वी यासाठी कार्बन डायऑक्साइडला प्राधान्य दिले जायचे. तंत्रज्ञानात जशी प्रगती झाली तसे एलपीजीच्या छोट्या आकाराच्या टाकीतून पिस्तूलमध्ये गॅस भरला जातो. पिस्तूल उत्पादक कंपनी हा गॅस मोफत भरून देते. पुष्पेंदर कुमार वापरत असलेले पिस्तूल वैयक्तिक होते की हवाई दलाचे हे समजू शकलेले नाही. पुष्पेंदर आता राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार नाही. पुष्पेंदर यांच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत