सुनेत्रा पवारांचे ‘भावी खासदार’चे पोस्टर.

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीच्या भावी खासदार अशी पोस्टर मुंबईत मंत्रालयाबाहेर तसंच नरिमन पॉईंट इथल्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर लावण्यात आली. सुनेत्रा पवार यांच्यासाठी लावण्यात आलेल्या या बॅनरवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांकडून बारामतीबाबत कोणताही आदेश गेला नसावा, भाजप विचाराच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामहून वाद निर्माण व्हावा, यासाठी बॅनर लावलं असावं, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.पवार विरुद्ध पवार करायचं किंवा बारामती लोकसभा निवडणुकीची जबाबदारी घ्या, त्याच कंडिशनवर भाजपमध्ये त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं असावं, असा संशयही रोहित पवारांनी व्यक्त केला. अजितदादा आणि भाजपच्या डोक्यात काय आहे ते लोकसभा निवडणुकीवेळी कळेल, असंही रोहित पवार म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत