कोल्हापुरात मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या फोडल्या.

सोमवारी कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात या मागणीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजीतील फलकांना काळे फासले. काही ठिकाणी फलकांची मोडतोड केली . सर्वोच्च न्यायालयाने प्रादेशिक भाषेत फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज कोल्हापुरात हे आंदोलन हाती घेतले.
मनसैनिकांनी शहराच्या विविध भागात फिरत जय महाराष्ट्र अशा घोषणा देत दुकानांवरील इंग्रजी पाट्या काळे फासत पुसून काढल्या. आजचे हे प्राथमिक स्वरूपातील इशारा देणारे आंदोलन आहे. दुकानदारांकडून आठवड्याभरात बदल न झाल्यास एकही इंग्रजी फलक जागी ठेवला जाणार नाही, असा इशारा शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांनी दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत