राज्याच्या अर्थसंकल्पात बार्टी साठी यावर्षी फक्त 75 कोटी..

प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी मार्फत अनुसूचित जाती संवर्गातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 365 कोटींची तरतूद असताना सामाजिक न्याय विभागा ने मात्र केवळ 75 कोटी अनुदान मंजूर करून पुन्हा एकदा अनुसूचित जाती च्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने उदासीनता दाखवली आहे.
विशेष म्हणजे राज्याचे सामाजिक न्याय खाते स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे.
बहुजनांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं यासाठी पुरोगामी महाराष्ट्रात नेहमीच महापुरुषांनी पुढाकार घेतलेला आहे, प्रसंगी विरोध पत्करून बहुजन समाजाला शिक्षणाची दारं खुली केली आहेत. परंतु सध्या मात्र मागणी केली असतानाही तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार पाहायला मिळतो आहे. एकूण तरतुदी च्या मानाने ही रक्कम अतिशय तुटपुंजी असल्याने समाजातून विशेषतः विद्यार्थी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत