नौदलाच्या गणवेशावर शिवरायांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा समावेश!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तारकर्ली इथं ५२ व्या नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातउपस्तिथ होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरित मानचिन्हांचा नौदलाच्या गणवेशावर समावेश केला जाणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्त्वानुसार समुद्रावर नियंत्रण ठेवणारा शासक हा सर्वशक्तीमान असतो. जिथं भारतीय आरमाराचा जन्म झाला त्या ठिकाणी नौदल दिवस साजरा करत असल्याचा विशेष आनंद असल्याचं सांगत त्यांनी सगळ्यांना नौसेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले देश गुलामीची मानसिकता सोडून पुढे जात आहे . उज्वल भविष्याच्या मार्गावर चालतांना लोकांनी नकारात्मक राजकारणाला सोडलं आहे असं ते म्हणाले. भारतीय इतिहास हा केवळ १ हजार वर्षाच्या गुलामगिरीचा नाही. तर तो शौर्य, कला, सामर्थ्य, ज्ञान आणि विज्ञानाचा आहे. असंही ते म्हणाले. भारत नील अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देत आहे. सागरमाला, मेरिटाईम व्हिजनच्या माध्यमातून काम करत असून गेल्या ९ वर्षात समुद्र किनाऱ्यांवरच्या व्यापारात ८० पट वुाढ झाली आहे. समुद्रकिनाऱ्यांवरच्या गावांच्या विकासाला आपलं सरकार प्राधान्य देत असून २०१४ पासून मासेमारीमध्ये ८० टक्के वाढ झाल्याचं ते म्हणाले. मच्छिमारांनाही ५ लाख रुपयांचं विम्याचं कवच देण्यात आलं असून त्यांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
मत्स्य उत्पादन प्रक्रियां उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा त्याचप्रमाणे बंदरं आणि समुद्रकिनाऱ्याच्या विकासाबरोबरचं कोकणाच्या विकासासाठीही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या अनेक योजनांची माहितीही यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. यानंतर नौदलाच्या विमानांनी आणि जहाजांनी शानदार प्रात्याक्षिकं सादर केली.
यावेळी केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथसिंग, केंद्रिय मंत्री नारायण राणे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर. हरिकुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत