मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड विभागातून मुंबईला विशेष गाडी.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो च्या संख्येने लोक चैत्यभूमी येथे येतात. यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून मुंबईला जाण्याकरता आदिलाबाद ते दादर ही एक विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.

ही विशेष गाडी आदिलाबाद येथून 05 डिसेंबर रोजी सकाळी 7.00 वाजता सुटून 6 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता दादरला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी 7 डिसेंबरला रात्री १ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. या गाडीत 12 जनरल आणि 2 एस.एल.आर. असे 14 डबे असतील.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!