हमासचे अनेक नेते गाझाच्या दक्षिण भागात लपून असल्यावरून त्या भागात आक्रमण

खान युनिस या गाझातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरातील व आसपासचे आणखी भाग रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. हमासचे अनेक नेते गाझाच्या दक्षिण भागात लपून असल्याचे सांगून इस्रायली लष्कराने त्याच्या आक्रमणाचा रोख या भागाकडे वळवला आहे.
इस्रायलच्या हवाई व जमिनीवरील हल्ल्यांचे लक्ष्य असलेल्या खान युनिस आणि दक्षिणेकडील रफाह शहरात, तसेच उत्तरेकडील काही भागांमध्ये रात्रभर जोरदार बॉम्बफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इस्रायली फौजांनी नागरिकांना गाझाचा उत्तर भाग सोडून जाण्यास सांगितल्यानंतर, २३ लाख लोकांपैकी अनेक जण दक्षिणेत कोंबलेल्या स्थितीत अडकले आहेत.
युद्धाला पुन्हा तोंड फुटल्यानंतर, आणखी एक तात्पुरत्या शस्त्रविरामाबाबत वाटाघाटी होण्याची आशा मावळली आहे. शुक्रवारी संपलेल्या आठवडाभराच्या युद्धविरामात गाझामध्ये ठेवण्यात आलेले इस्रायली व परदेशी ओलीस आणि इस्रायलने तुरुंगात टाकलेले पॅलेस्टिनी यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत