गिरगावातील आगीत दोन नागरिकांचा जळून मृत्यू

मुंबई : गिरगाव येथील एका इमारतीला शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत दोन ज्येष्ठ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. नलिनी शाह (८२ वर्षं) आणि हिरेन शाह (६० वर्षं) अशी मृतांची नावे आहेत. गिरगाव चौपाटी येथील रांगणेकर मार्गावर असलेल्या गोमती भवन इमारतीत शनिवारी साडेसातच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाने लगेचच बचावकार्य हाती घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच इमारतीत अडकलेल्या नऊ जणांना बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांना एक मृतदेह शयनगृहात आढळला. तर दुसरा स्नानगृहात आढळला. हे दोन्ही मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत होते. रात्री दहा वाजता अग्निशमन दलाने ही आग स्तर दोनची असल्याची वर्दी दिली होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत