विजयाच्या हॅटट्रिकने 2024च्या हॅटट्रिकची खात्री-मोदी.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात भाजपला दणदणीत विजयी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदारांचे आभार मानले. आजच्या विधानसभा निकालांमुळे भाजपच्या विजयाची हॅटट्रिक झाली असल्याचे मोदी म्हणाले. या हॅटट्रिकमुळं पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाच्या हॅटट्रिकची गॅरंटी मिळाली असल्याचं काही जण बोलत असल्याचं मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. भ्रष्टाचार, तुष्टीकरण आणि परिवारवादाबद्दल मतदारांमध्ये चिड निर्माण झाली असल्याचं आजच्या निकालातून दिसून येतं, असं मोदी यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत