“त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.…”; शरद पवारांचा हल्लाबोल

शरद पवारांनी शनिवारी (२ डिसेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. यावेळी पवारांनी प्रफुल पटेल यांच्या पुस्तक लिहिण्याच्या इशाऱ्याचाही चांगलाच समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. प्रफुल पटेल पुस्तक यांचं पुस्तक कधी येतंय याची मी वाट पाहतोय. त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी त्यावर पुस्तक लिहावं. त्यात त्यांनी एक प्रकरण अलिकडे लोक पक्ष सोडून का जातात यावर लिहावं. त्यांच्या घरात ईडीचे अधिकारी आले होते असं ऐकलंय. त्यावरही पुस्तकात एक प्रकरण लिहावं.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केले. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याला प्रत्यूत्तर म्हणून आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत