
पाकिस्तान व बांगलादेश यांना लागून असलेल्या भारताच्या दोन प्रमुख सीमांवर सुमारे ६० किलोमीटरच्या पट्ट्यांमधील रिकाम्या जागा भरून काढण्याचे काम सुरू असल्यामुळे, येत्या दोन वर्षांमध्ये या सीमा संपूर्णपणे सुरक्षित केल्या जातील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले.
देशाच्या पश्चिम व पूर्व दिशांना या दोन सीमांवरील सर्व रिकाम्या जागा भरून काढण्यात येत असून केवळ ६० किलोमीटरचे काम बाकी आहे. २२९० किलोमीटरची भारत- पाकिस्तान सीमा आणि ४०९६ किलोमीटरची भारत- बांगलादेश सीमा या दोन्ही सीमांवर नद्या, पर्वतीय आणि दलदलीचे भाग आहेत.
केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये भारत- पाकिस्तान व भारत- बांगलादेश सीमांवरील सुमारे ५६० किलोमीटरच्या रिकाम्या जागा भरून काढल्या असून या सीमांवर कुंपण घातले आहे. यापूर्वी या फटींचा वापर घुसखोरी व तस्करीसाठी केला जात होता, असे शहा म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत