सरकारविरोधात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या – खोट्या ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला – उच्च न्यायालय ५ जानेवारी रोजी देणार निर्णय

सरकारविरोधात समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या – खोट्या ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या माहिती – तंत्रज्ञान नियमांतील दुरुस्तीच्या विरोधात करण्यात आलेल्या याचिकांवर उच्च न्यायालय ५ जानेवारी रोजी निर्णय देणार आहे. दरम्यान, निर्णयापर्यंत सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार नसल्याची हमी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली.
या प्रकरणी १ डिसेंबरपर्यंत निकाल देऊ, असे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठाने याचिकांवरील निर्णय राखून ठेवताना स्पष्ट केले होते. मात्र, निकालपत्र अद्याप तयार झालेले नाही. परंतु, या प्रकरणी आम्ही ११ डिसेंबर रोजी निर्णय देऊ, असे न्यायमूर्ती पटेल यांनी शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सांगितले. त्यावर, ख्रिासमससाठीच्या सुट्टीनंतर न्यायालय या प्रकरणी निर्णय देऊ शकते. तसेच, तोपर्यंत सुधारित नियमांची अंमलबजावणी न करण्याची हमी कायम ठेवली जाईल, असे केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर, न्यायालयाने या प्रकरणी ५ जानेवारी रोजी निर्णय देण्याचे स्पष्ट केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत