बौध्द विहाराच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आंबेडकरी समाजाने दिली चेतावणी.

नाशिकरोड येथील महाकर्मभूमि बौध्द विहार (ट्रस्ट नं.ए-१७२) असे हे ऐतिहासीक बौध्द विहार जे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. बौध्द आंबेडकरी समाजाचे श्रध्दास्थान असलेले अशा ऐतिहासिक बौध्द विहाराचे उर्वरित राहिलेले कामे करीण्याकरीता 2016 रोजी तात्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या निधीतुन व पर्यटनमंत्री यांच्या मंत्रालयातुन बौध्द विहाराच्या कामास ४५ लाख रु. देऊन
प्रामुख्याने बौध्द ट्रस्टीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम यांना विविध कामांच्या ठरावाची यादी देऊन सुचित करण्यात आले होते. तसेच 27/5/2016 रोजी मा.आमदार यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग यांच्याकडे कामाची ठरावाचे पत्र दिले असतांना अद्याप पर्यंत ठरावाप्रमाणे कामे झाले नाहीत व जे कामे केली ती कामे हलक्या व निकृष्ठ दर्जाची केल्याने त्या कामाची चौकशी होऊन संबंधीत अधिकारी व अभियंता, कर्मचारी व त्यांचे ठेकेदार व त्यांना सहमत असलेले विश्वस्त यांची चौकशी होण्याकरीता मागणी केली होती.
त्याचबरोबर माहितीच्या अधिकारीकारामध्ये माहिती मागविली असता माहिती न मिळाल्यामुळे पुन्हा माहितीचे अपिल करावे लागले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाने कामाशी निगडीत माहिती दिली नाही.
हा संपूर्ण प्रकार जाणून बुजून आणि कुठल्यातरी द्वेशापोटी करण्यात आल्याचे लक्षात येत आहे. आंबेडकरी समाजाचं श्रद्धास्थान असलेले बौध्द्धविहार विकसित होऊ नये हाच प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याचा दिसून येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला हा इशारा आहे उर्वरित काम येत्या 6 डिसेंबर 2023 च्या आधी त्वरित पूर्ण करावे. नाहीतर आंबेडकरी समाजाच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहा.
सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक, यांच्या नाशिकरोड बौद्धविहार कामातील भ्रष्टाचाराच्या विरोधात नाशिकरोड बौद्धविहार अध्यक्ष आयु.विलास कोंडाजी गांगुर्डे हे
1 डिसेंबर 2023 रोजी उपोषणाला बसणार आहे. सदर उपोषण बौध्दविहार नाशिकरोड याठिकाणी होणार आहे.
यावेळी येत्या 6 डिसेंबर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी शासनाच्या बौद्धविहाराच्या अपूर्ण काम आणि भ्रष्टाचार यामुळे बौद्ध आंबेडकरी समाजाच्या रोषाने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. तसेच मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहील. याला संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक जबाबदार राहील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत