
अमेरिकेच्या बॉलिंग अॅलेतील स्पेयरटाइम रिक्रिएशन आणि स्कीमेंजीस बार व ग्रिल या रेस्टॉरंटमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला असून यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली असून त्यांनी सिटी कॉन्सलर रॉबर्ट मॅकार्थी यांच्याशी संपर्क साधला होता. या हल्ल्यात ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मेन स्टेट पोलीस आणि काउंटी शेरीफ यांनी बुधवारी रात्री एक शूटर सक्रिय असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर, लागलीच हा हल्ला झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले असून नागरिकांनी दरवाजे बंद करून घरातच राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत