उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत भीषण स्फोट.

काल उल्हासनगरमधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात शैलेश यादव या २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली.
सेंच्युरी रेयॉन कंपनीत शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात शैलेश यादव या २५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. त्याचे वडील राजकारण यादव यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कंपनीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या जागी शैलेश नोकरीस लागला होता. मागील तीन वर्षांपासून तो कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करत होता. मात्र तीन महिन्यांपूर्वीच कंपनीने त्याला कायमस्वरूपी नोकरी दिली होती. शैलेश हा मूळचा उत्तर प्रदेश मधील आजमगडचा असून तो पत्नी, अडीच वर्षांची मुलगी, ९ महिन्यांचा मुलगा व भाऊ ब्रिजेशसह म्हारळ परिसरात राहत होता. घटनेची माहिती मिळताच त्याचा भाऊ आणि मामाने घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या खिशात सापडलेल्या किल्लीवरून त्याची ओळख पटवली. शैलेशच्या आकस्मिक मृत्यूने या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत राजेश श्रीवास्तव यांचादेखील मृत्यू झाला. ५४ वर्षीय राजेश हे काटेमानिवली परिसरात वास्तव्यास होते. या परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असे. त्यांचा भाऊ विवेकदेखील याच कंपनीत वेगळ्या विभागात कामाला आहे. त्यांनीच कुटुंबीयांना राजेशच्या मृत्यूची कल्पना दिली. राजेश यांच्या डोक्याचा आणि शरीराचा काही भाग सापडल्याने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. राजेश यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न ठरल्याची माहिती त्यांच्या भावाने दिली. मात्र तिचे लग्न त्यांना पाहता येणार नाही हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत