मिरज सिव्हील मधील खाटांवर चक्क कुत्र्यांचा मुक्काम- रोहित पवार यांचे आरोग्यमंत्र्यांवर टीका

सांगली दि. 24: मिरजेतील शासकीय रुग्णालयात चक्क कुत्रे झोपा काढत असल्याचे छायाचित्र आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमावर शेअर करीत आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दीड महिन्यापूर्वी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील हा प्रकार समोर आल्यानंतर याची चौकशी करून ते रखवालदार नियुक्त केल्याचे सिव्हिल वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले आमदार रोहित पवार यांनी शेअर केलेल्या छायाचित्रेत मिरज शासकीय रुग्णालयात कुत्र्यांना उपचारासाठी ठेवलेल्या खात्यांवर चक्क तीन कुत्रे झोपलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी हे फोटो पाठवले असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. दीड महिन्यापूर्वी मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजा माध्यमावर पाठवलेले हे छायाचित्र रोहित पवार यांना आपल्या अकाउंट वरून शेअर केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत