पोलिस कुटुंबांसाठी उद्या १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत .
मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यात आयटी, कपडे निर्मिती, अन्न पदार्थ प्रकिया आदी क्षेत्रातील एकूण १० प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. येत्या १ डिसेंबर रोजी ताडदेव व वरळी येथे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत या वर्गांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून मुंबईतील ताडदेव, वरळी, नायगाव, कलिना आणि मरोळ या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे. मुंबई पोलीस आणि पोलिसांच्या कुटुंबातील इतर सदस्य या वर्गांमध्ये सामील होऊ शकतात. किमान ३०० तास ते ५०० तास हे कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू राहतील. १८ ते ४५ वयोगटातील महिला व पुरुष आधार ओळखपत्राद्वारे प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत