
राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड हे सरकारने उचललेलं एक विचारपूर्वक पाऊल असून त्यामुळे निर्यात आणि खासकरुन कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणं तसंच त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचं केंद्रिय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी सांगिलंत. सहकारी निर्यात या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचं उदघाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं झालं. त्यावेळी ते बोलत होते. या एक दिवसीय चर्चासत्रात देशभरातील सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसह अभ्यासक, नेते आदी एक हजाराहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
शहा पुढे म्हणाले की, या निगमच्या माध्यमातून क्रॉप प़ॅटर्न बदलणं आणि जगात ज्याची आवश्यकता अधिक आहे ती पिकं घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून घेतला जाणार आहे. सध्या देशात १२ लाख शेतकरी हे सेंद्रिय शेतकरी म्हणून नोंदणीकृत आहेत. राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून येणाऱ्या २०२७ पर्यंत २ कोटीहून अधिक शेतकरी यात नोंदणी करतील असा आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेतीच्या वाढीमध्ये पुढाकार घेतला असून येणारे काळात एका विश्वसनीय ब्रॅण्ड़च्या माध्य़मातून सर्व चाचण्या पूर्ण करणारी सेंद्रिय शेती उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची योजना असून त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा दीडपट ते दोन पट होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
वाणिज्य मंत्री पियूष गोयल म्हणाले की देशाने डेअरी क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, देशाला डेअरी हब अर्थात जगातील आघाडीचं दुग्धजन्य पदार्थ उत्पादन केंद्र बनविण्याचा मानस असल्याचं हि गोयल यांनी सांगितलं. त्यांनी बायो फ्युएल ला प्रोत्साहन देण्यावर भर दिला. या एकदिवसीय परिषदेत देशाला डेअरी हब बनविण्यावर विचारमंथन होणार असून तज्ज्ञ समिती याविषयी सादरीकरणही करणार आहे. देशातील सर्वात मोठ्या अन्नधान्य साठवण योजनेविषयी तसच निर्यात अधिक वेगानं करण्याबाबत बाजारपेठांचं आधुनिकीकरण करण्याविषयी यामध्ये विशेष चर्चा करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत