57 गावातील वीज पुरवठा बंद तसेच इंटरनेट सेवा हे ठप्प झाली सरकारला सभेत हिंसाचार घडवून आणायचा होता का जरांगे पाटलांचा मोठा आरोप.

अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या शनिवारी सभा झाली. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत जरांगे म्हणाले, आमच्या सभेवेळी सरकारने इंटरनेट बंद पाडून सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला होता, आमचे मोबाईलही बंद केले. एवढी मोठी सभा पहिल्यांदाच झाली. सभेवेळी २७ गावातील वीज पुरवठा बंद केला, सरकारने हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.
यावेळी सभे ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषण करत, येत्या १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली. दरम्यान, आता या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही आरोप केले होते. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत