संविधान दिनानिमित्त आदिवासी मुला मुलींचे वस्तीग्रह धाराशिव येथे विचार संमेलन

ऍड अजित कांबळे संविधान दिनानिमित्त आदिवासी मुला मुलींचे वस्तीग्रह धाराशिव येथे आपले विचार व्यक्त करताना


भारतामध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस (Samvidhan Diwas) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस (National Law Day) म्हणून देखील ओळखला जातो. मग आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेत लोकशाहीला बळकटी देणार्या संविधानाला चिरायू ठेवण्यासाठी आज रविवार दि.26/11/2023 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
2 वर्षे 11 महिने 18 दिवस या दीर्घ कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान पूर्ण केले.भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.भारतीय राज्यघटना हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे . दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये यांचे सीमांकन करणारी चौकट मांडते आणि मूलभूत अधिकार,निर्देश तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये ठरवते.भारतीय संविधानामुळे भारतीय नागरिकांना मुलभूत अधिकारांसह अनेक महत्त्वांचे हक्क मिळतात.ज्यामुळे नागरिकांना कुठेही वावरण्याची, मुक्तपणे संवाद साधण्याची आणि आपल्या हक्कासाठी लढण्याची ताकद मिळाली.ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.आधुनिक भारताचे जनक, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज रविवार दि.26/11/2023 रोजी बुद्धीस्ट शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशिय संघटना,महाराष्ट्र राज्य.प्रकल्प सोलापूरचे पदाधिकारी आणि आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह धाराशिव ( प्रकल्प सोलापूर ) यांचे विद्यमाने संविधान दिन मोठ्या अभिमानाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आयु.चंद्रकांत शिंदे साहेब (नायब तहसिलदार रो.ह.यो.धाराशिव) उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून आयु.प्रा.महेंद्रकुमार चंदनशिवे ( मराठी विभाग प्रमुख,कर्मवीर मामासाहेब जगदाळे महविद्यालय,बार्शी.), आयु.ॲड.अजित कांबळे सर ( जिल्हा सत्र न्यायालय,धाराशिव.) व आयु.ॲड.सुदेश माळाळे सर ( जिल्हा सत्र न्यायालय,धाराशिव.)हे लाभले. या कार्यक्रमांमध्ये अडवोकेट अजित कांबळे सर यांनी संविधान आणि संविधानातील विविध तरतुदी यांची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या व्याख्यानातून चांगल्या प्रकारे स्पष्ट केली त्यामुळे संविधान म्हणजे फक्त अनुसूचित जाती मधील काही लोकांसाठीच नसून सर्वांसाठी त्या तरतुदी आहेत त्यामुळे संविधान किती महत्त्वाचे आहे याबाबत सर्वांना अवगत केले त्यानंतर प्राध्यापक महेंद्र कुमार चंदनशिवे यांनी बाबासाहेब यांचे जीवन व कार्य हे सर्वांसाठीच किती विविध अंगी माध्यमातून भारतीय समोर येणे आवश्यक आहे तसेच बाबासाहेबांची विविध रूपे व्याख्यानांमधून सर्वासमोर उलगडली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत शिंदे साहेब यांनी प्रशासनामध्ये संविधान सर्वांसाठी किती महत्त्वाचे आहे ?संविधानाची आवश्यकता का आहे? हेच संविधान का आवश्यक आहे ?व सध्या संविधान कोणत्या कारणासाठी बदलण्याचे प्रयत्न होत आहेत ?त्यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांनी समाजातील वाईट चाली रुढीपरंपरा टाकून देऊन शिक्षणाच्या माध्यमातून व संविधानाने दिलेल्या सवलतीच्या माध्यमातून स्वतःचा व समाजाचा विकास करावा त्याचप्रमाणे संविधानाने दिलेले अधिकार सवलती टिकून ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे स्पष्टपणे विद्यार्थ्यांना खडे बोल सुनावले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदिवासी विकास निरीक्षक आयु.विशाल सरतापे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन वसतीगृहाचे गृहपाल आयु.प्रदिप समुद्रे यांनी केले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृहपाल श्रीम.चव्हाण मॅडम,श्रीम. सुजाता गायकवाड मॅडम आयु.विनोद थोरे सर,आयु.राकेश धावारे सर,आयु.युवराज चंदनशिवे सर व आयु.मंगेश शिंदे सर यांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने दोन्ही वसतीगृहाचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी व कार्यकर्ते पालक उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत