
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या आगामी हंगामासाठी गुजरात टायटन्सने कर्णधार आणि तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला संघात कायम ठेवले आहे. आयपीएल’मधील दहाही संघांना खेळाडू कायम ठेवण्यासाठी आणि करारमुक्त करण्यासाठी रविवापर्यंतचा (२६ नोव्हेंबर) कालावधी होता. गेल्या काही दिवसांपासून हार्दिकबाबत बरीच चर्चा सुरू होती. ‘आयपीएल’ पदार्पणापासून सात वर्षे मुंबईकडून खेळलेल्या हार्दिकने गेल्या दोन हंगामांत गुजरात संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२च्या हंगामात जेतेपद, तर २०२३च्या हंगामात उपविजेतेपद मिळवले होते. मात्र, तो आता मुंबई संघात परतण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा होती. परंतु गुजरातने तुर्तास तरी त्याला संघात कायम राखले आहे.
तसेच मुंबई इंडियन्सने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, कोलकाता नाइट रायडर्सने अष्टपैलू शार्दूल ठाकूर आणि फिरकीपटू सुनील नरेन, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा आणि वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांना करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत