रविवारी मुंबईच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी, २६ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार . मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप-डाऊन धीम्या मार्गावर; तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारी-रविवारी (ता. २५, २६) रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.मध्य रेल्वेकुठे : ठाणे ते माटुंगा, अप-डाऊन धीमा मार्गकधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५परिणाम : ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावतील. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. त्यापुढे धिम्या मार्गावरून चालवण्यात येतील; तर कल्याण येथून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकात या लोकल थांबतील. पुढे माटुंगा येथे अप धीम्या मार्गावरून त्या मार्गस्थ होतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत