“सरकार झाले जागृत” डीपफेक प्रकाराला आळा घालण्यासाठी

गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांचे डीपफेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर वावरणाऱ्या प्रत्येकासाठी ही धोक्याची घंटा आहे. डीपफेकचे जाळे पसरत गेले तर सामान्य कुटुंबातील महिलांनाही याची झळ बसू शकते. यावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. याबाबत काल शुक्रवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली.
डीपफेक प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकार पातळीवर नियमन केले जाणार आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जाणार आहे. याबाबत माहिती देताना माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, डीपफेक लोकशाहीसाठी एक नवीन धोका आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत