आरक्षणात अडथळा आणणाऱ्यास योग्य धडा शिकवू; मनोज जरांगे-पाटील यांचा सभेत हल्लाबोल

आरक्षणात अडथळा आणणाऱ्यास योग्य धडा शिकवू अशी ग्वाही मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (ता. २१) येथे दिली.शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी मराठ्यांसाठी लढेल.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात साडेदहाला मनोज जरांगे-पाटील यांची सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते.आता आपण हा लढा जिंकत आलेलो आहोत, आज आपण या सभेच्या माध्यमातून 85 टक्के मराठा ऐकी निर्मान झाली आहे. माझी तब्येत ठीक नसतानाही मी २४ तास मराठा समाज बांधवांच्या भेटी घेऊन आपली ऐकी राखण्यासाठी आवाहन करीत आहे. ३२ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या असून, आता एक कोटी मराठा समाज बांधवांना त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे आरक्षण आपल्या जवळ आले आहे.
त्यांच्या बोलण्यातून मराठा समजाप्रती असलेली सद्भावना दीसून येत होती. मराठ्यांची वज्रमूठ एक ठेवा, असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काहींनी कशाकशात लाभ उठवले, ही मी सांगण्याची गरज नसून त्यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे असून, वेळ येताच कार्यक्रम निश्चित करण्यात येईल, अशी मी ग्वाही देतो. सध्या फक्त आरक्षण हाच विषय असल्याने उद्याच्या सभेत मी सगळे सविस्तर सांगेन, असेही ते म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत