महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्हे नमो निर्माण सेना ? -संजय राऊत.

राज्यातील सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात, वॉशिंग मशिनमध्ये घेऊन साफ करणं हा व्याभिचार नाही का?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुडी पाडवा मेळाव्यात नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया नोंदवताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत अशी कोणती फाइल दाखवली की त्यांनी मुंबई येऊन थेट भाजपाला समर्थन जाहीर केलं? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
जनतेला “मोदी शहा हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत त्यांना राज्यात पाऊल ठेऊ देऊ नका” असं आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांना असा कोणता साक्षात्कार झाला की त्यांनी पाठिंबा जाहीर केला ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात, वॉशिंग मशिनमध्ये घेऊन साफ करणं हा व्याभिचार नाही का? असा संतप्त सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत