युवकांसाठी शिबिराची सुवर्ण संधी.

दिवाळीच्या दिवसांमध्ये जवळपास सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांना सुट्ट्या असतात. बऱ्याच कार्यालयाला सुद्धा वरील नियोजित शिबिराच्या दरम्यान सुट्ट्या आहेत. बहुतांश लोक या सुट्ट्यांमध्ये बाहेर पिकनिकला जात असतात. आमची आपल्याला विनंती आहे की आपण एक सुंदर आध्यात्मिक पिकनिक करण्याकरिता नियोजित 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर च्या धम्मक्रांती शिबिरामध्ये दाखल होऊन डॉ. आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी तथागत बुद्धाने सांगितलेले चार आर्यसत्य समजून घेण्यासाठी व जीवनातील खरे सत्य समजून घेण्यासाठी आपण या शिबिर रुपाने आयोजित धार्मिक पिकनिकला यावे. सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगांमध्ये, अतिशय घनदाट जंगलात, निसर्गरम्य पर्यटन स्थळी बोरधरण या ठिकाणी स्थित अशा धम्म शिबिर केंद्रामध्ये आपले सहा दिवस निश्चितच खूप आनंदाचे, सुखाचे, खूप काही नवीन शिकायला मिळण्याच्या समाधनाचे, मनोरंजनाचे, मानसिक समाधानाचे जातील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

तरी जास्तीत जास्त युवक युवतींनी या सुंदर अश्या निसर्गरम्य वातावरणात धम्मक्रांती शिबिरात सहभागी होऊन आलेल्या संधीचा छान लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत