शाळांमध्ये संविधान सन्मान परीक्षा: मानवाधिकार संघटनेचा उपक्रम.

भंडारा : ६७ व्या संविधान दिनानिमित्त केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्यद्वारा संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा संघटनेचे राष्ट्रीय चेअरमन डॉ. मिलिंद दहिवले व महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ. देवानंद नंदागवळी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
संविधान जागृती व महामानवांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून भावी पिढीचा उत्कर्ष साधण्यासाठी या परीक्षेत महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नंदुरबार, मुंबई, अंबरनाथ, यवतमाळ, अकोला, अमरावती, लातूर, सातारा, बीड, गडचिरोली, रायगड, वर्धा, अमरावती, नांदेड, परभणी, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, नाशिक, हिंगोली, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, सांगली, धुळे, अहमदनगर या जिल्ह्यामधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन परीक्षा दिली. एवढेच नव्हे तर कर्नाटक, मध्यप्रदेशमधील विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत सहभाग नोंदविला. या संविधान सन्मान प्रतियोगिता परीक्षेत गुणानुक्रमे येणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर रोजी संविधानदिनी रोख पुरस्कार, भारतीय संविधान व महामानवांची वैचारिक पुस्तके देऊन मान्यवरांच्या हस्ते भंडारा येथे गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. देवानंद नंदागवळी, सोपान रंगारी, जयेंद्र देशपांडे, महेंद्र तिरपुडे, नाशिक चवरे, प्रियदर्शन सोनटक्के, अनिल कोकने आण सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत