चीनमध्ये न्यूमोनिया, भारतात सतर्कतेचे आदेश.

दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगातील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था चीनमधून आलेल्या कोरोनामुळे धोक्यात आली होती. चीनमध्ये कोरोनाचा उद्रेकानंतर आता न्यूमोनिआचा प्रसार वेगाने होत आहे. या न्यूमोनिआमुळे रोज हजारो मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील या प्रकारानंतर केंद्र सरकारकडून सगळ्या राज्याच्या आरोग्य विभागला सतर्कतेचा इशारा पावले उचलली गेली आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या हिवताप विभागाचे सहसंचालक प्रताप सरणीकर यांच्याकडून राज्यातील सगळ्या जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला सूचना जारी केल्या आहेत. सध्या तरी भारतात याचा धोका नसला तरी सगळी आरोग्य व्यवस्था अलर्टवर आहे.
संसर्ग इन्फ्लुएझा, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया, कोव्हिडमुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात केंद्रसरकारकडून आलेल्या सूचनानंतर महाराष्ट्रात “अॅडव्हाझरी” जारी करण्यात आली आहे. प्रत्येक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात सारीच सर्वेक्षण करा, श्वसनसंस्थेचे येणारे अहवाल गांभीर्याने घ्या, मनुष्यबळ प्रशिक्षण देवून तयार कराव,ऑक्सीजन प्लांट, खाटाची व्यवस्था करण्यात यावी, उद्रेक परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज करावी, असे आदेश आरोग्य विभागाने सर्व महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य विभागातील केंद्रांना दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत