या भेदभावामुळे समाजामध्ये संतापाची लाट

मागासवर्गातील मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण करण्यासाठी इयत्ता ५ ते १० पर्यंतच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेतही अनुसूचित जातीच्या मुलींशी भेदभाव होत असल्याचे दिसून येत आहे. एससीच्या मुलींपेक्षा इतर प्रवर्गातील विद्यार्थिनींना तिप्पट शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे परिपत्रकामधून समोर येत आहे. समाज कल्याण विभागाकडून नुकत्याच आलेल्या परिपत्रकानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत अनुसूचित जातीच्या इयत्ता ५ ते ७ वर्गातील मुलींसाठी ६०० रुपये, तर इयत्ता ८ ते १० च्या मुलींसाठी १००० रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. याच दोन गटातील ओबीसीच्या विद्यार्थिनींना अनुक्रमे २५०० रुपये व ३००० रुपये देण्यात येतात. विमुक्त भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता ५ ते ७ च्या मुलींना ६०० रुपये तर इयत्ता ८ ते १० वर्गातील मुलींना ३००० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सफाई कामगारांच्या मुलींना इयत्ता १ ते १० व्या वर्गातील मुलींना २२५० रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत प्रवर्गनिहाय निधीमधील फरक अन्यायकारक असल्याची टीका संघटनांकडून होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत