शिंदेंच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

आम्ही पुणेकर’ या संस्थेच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुपवाडा येथे आला आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास या पुतळ्याचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) येथे बसविण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंदही घेणार आहेत.
यावेळी जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.पाकिस्तानच्या दिशेनेपुतळ्याच्या समोर असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे, अशापद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे एक हजार ८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत