उस्मानाबामध्ये भारतीय बौद्ध महासभेकडून वर्षावासाची सांगता, संस्कार आणि संस्कृतीच्या लढ्यामध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून द्यावे !

-जिल्हाध्यक्ष,विजयमाला सु धावारे
उस्मानाबाद : दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी उस्मानाबाद शहरातील स्मृती बुद्धविहार येथे बौद्ध धर्मातील पवित्र वर्षावासाच्या औचित्याने वर्षावास सांगता कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 10.00 वाजता करण्यात आले होते.तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भन्ते प्रज्ञाबोधि,जिल्हाध्यक्ष विजयमाला धावारे,वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब जानराव,शिलाताई मारुती पवार,काजल प्रदीप गायकवाड,वनमाला मानिक बनसोडे,सुनील देविदास बनसोडे,जि. संघटक विजय अशोक बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमाचे पूजा करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.तर लागलीच स्मृती बुद्धविहार येथून क्रांती चौक,अजिंठा नगर,बौद्ध नगर,पोलाद चौक,सम्राट अशोक चौक,निळा चौक येथून सामूहिक धम्मफेरी मोठ्या उत्साहात आणि जय जयकरत काढण्यात आली,या धम्मफेरीचा समारोप स्मृती बुद्धविहार येथे करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी प्रवासाच्या संपूर्ण चार महिन्यांमध्ये धम्म प्रवचन देणाऱ्या,धम्म ग्रंथाचे वाचन करणाऱ्या,वर्षावासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या,उपोथत,अन्नदान,अर्थदान करणाऱ्या बौद्ध उपासक आणि उपासीकांचा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने यथोचित मान सन्मान करण्यात आला.तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवरांसह भंते प्रज्ञाबोधी,भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक गुणवंत सोनवणे,जिल्हा संघटक विद्यानंद वाघमारे, शालू ताई रोकडे,मनोरमा काटे,युवराज पौळ,किरण धाकतोडे,बाळासाहेब धावारे,भागवत माने,जयश्रीताई चव्हाण,काजलताई गायकवाड,
शीलाताई पवार,मीराताई शिंदे यांनी वर्षावासाच्या अनुषंगाने आपली मनोगत व्यक्त केली.तसेच या वर्षावास सांगता कार्यक्रमांमध्ये कुमारी सांची प्रमोद हावळे हिच्या वाढदिवसाच्या औचित्याने स्मृति बुद्ध विहारातील कार्यक्रमास स्वीट म्हणून मोतीचूर लाडूचे वाटप केले.

तसेच कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्षीय समारोप करताना विजयमाला धावारे म्हणाले की, वर्षावासाच्या औचित्याने उस्मानाबाद तालुक्यात चांगल्या प्रकारे वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या आयोजनातून अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांना भारतीय बौद्ध महासभेशी जोडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारत बौद्धमय करण्याच्या स्वप्नाला गतीमान करण्याचं काम आपण करत आहात.त्याच बरोबर सध्याच्या उद्भवलेल्या विध्वंसक सामाजिक, राजकीय आणि धार्मिक परिस्थितीवर मात करण्यासाठी भारतीयांना बौद्ध धम्माची अत्यंत गरज असल्याचे ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपण सर्वांनी भविष्यकाळातही बुद्धांनी दिलेला संस्काराने संस्कृतीचा लढा सामान्य लोकांमध्ये पोचवून धम्म चळवळ गतिमान करणे अत्यंत गरजेचे आहे,असे म्हणाल्या.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिटणीस उमाजी गायकवाड आणि तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी उपस्थितांचे आभार केले मानले,वर्षावास सांगतेच्या या कार्यक्रमास जिल्हा पर्यटक जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष विश्वास पांडागळे,जिल्हा हिशोब तपासणीस देविदास कदम,महिला उपाध्यक्ष शीलाताई चंदनशिवे,संघटक मीनाताई लगाडे,
ता.पर्यटन विभागाचे स्वामीराव चंदनशिवे,धनंजय वाघमारे आता सैनिक दलाचे सचिव सचिन दिलपाक,स्वराज जानराव,ता.संस्कार सचिव आजिनाथ सरवदे संघटक बापू जावळे,कार्यालयीन सचिव महादेव एडके यांची प्रमुख उपस्थिती होती तर.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेब कांबळे,रमेश कांबळे,संपत शिंदे,सिद्राम वाघमारे,अंकुश उबाळे,विधाते प्रताप यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.तर शेवटी सामूहिक अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला.
पत्रकार : विजय अशोक बनसोडे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत