ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यात ५ तालुक्यात खरेदी केंद्र सुरु

ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी यवतमाळ जिल्ह्यात महागाव, पांढरकवडा, झरी, पुसद, आर्णी या पाच तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू आहे. यात तालुका खरेदी विक’ी समिती महागाव, तालुका खरेदी विकी समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रकि’या सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलू (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी या केंद्रांचा समावेश आहे..
शेतकऱ्यांनी नोंदणी करताना या हंगामापासून ज्यांचा सातबारा आहे. त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. शेतकरी नोंदणी मोबाईल अॅपव्दारे होत असून लाईव्ह फोटो देखील या पव्दारे अपलोड करता येणार आहे. bulk grains ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विकठी करावयाची आहे. त्याच शेतकऱ्यांने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करुन नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विकी करावयाची आहे. त्या शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर स्वत: हजर राहुन किंवा स्वतः मोबाईल पव्दारे लाईव्ह फोटो अपलोड करावा. ज्वारी, मका, बाजरी व रागी हे भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी 30 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी भरडधान्य नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी आवाहन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत