मुंबईची हवा अधिकट बिकट, मुंबईकरांना काळजीचे सल्ले.

स्विस एअर मॉनिटर IQAir च्या निष्कर्षानुसार सोमवारी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता ही जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांमध्ये होती. पृथ्वीतलावरील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली चौथ्या, मुंबई सातव्या, तर कोलकाता दहाव्या क्रमांकावर होते. सोमवारी मुंबईची हवा अस्वस्थ करणारी होती, सलग तीन दिवसांहून अधिक काळ असे वातावरण राहिल्याचे आयक्यूएअरने म्हटले आहे.
हवेची गुणवत्ता किंचित सुधारण्याचा अंदाज आहे, परंतु तरीही संवेदनशील वर्गासाठी हवा प्रकृतीस अस्वास्थ्य करणारी आहे. मुंबईकरांनी घराबाहेर जास्त श्रम करणे टाळावे, मास्क घालावे आणि घरात एअर प्युरिफायर चालवावे, असा सल्ला आयक्यूएअरने दिला आहे. वांद्रे भागातील खेरवाडी, बीकेसी याशिवाय चेंबूर आणि वरळी या उपनगरांमध्ये सोमवारी सर्वाधिक अस्वास्थ्यकर हवा होती.
मुंबई शहराची पीएम२.५ क्षमता ६२ यूजी/एम३ आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देशित केलेल्या मानक ६० पेक्षा किंचित जास्त आहे. पीएम२.५ आणि पीएम१० हे शब्द वेगवेगळ्या आकाराच्या वायूजन्य कणांच्या संदर्भासाठी वापरले जातात. यामुळे हवेच्या गुणवत्तेवर आणि मानवी आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. हिवाळ्यास अजून अवकाश असतानाही, चेंबूर, अंधेरी, नवी मुंबई, बीकेसी, मालाड आणि माझगाव या भागात आधीच हवेची गुणवत्ता मध्यम ते खराब दर्शविण्यास सुरुवात झाल्याचे सफर (सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) ने म्हटलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत