धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू, पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई.

धाराशिव जिल्हयात चालू असलेल्या आंदोलनामुळे सार्वजनिक व खाजगी मालमतेस मोठया प्रमाणावर हानी पोहचत आहे. याबाबत मी स्वतः खात्री केलेली आहे. त्यामुळे जिल्हयात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णयाप्रत मी आलो असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
त्याअर्थी वेळेअभावी सर्व संबंधीत यांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने मी सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धाराशिव मला प्राप्त अंगीभूत अधिकाराचा वापर करुन फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (2) अन्वये एकतर्फी धाराशिव जिल्हा हद्दीपर्यंत पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू करत आहे. सदरील संचारबंदी आदेश शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. या कालावधीत 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत,
सदरील आदेशामधून खालील बाबींना सूट राहील..
- शासकीय / निमशासकीय कार्यालये.
- दूध वितरण.
- पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थापना.
- सर्व बँका,
- दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना.
- रस्ते वाहतूक व रेल्वे व्यवस्था यांना सुट दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत