आईवरुन मुलांची जात ठरवता येणार नसल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट…

राज्याच्या शिष्टमंडळाने काल जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथे मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. आईवरुन मुलांची जात ठरवता येणार नाही, असं राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.
एखादा व्यक्ती कुणबी असेल तर त्याच्या पत्नीच्या नात्यातल्या नातेवाइकांना तसं कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. शेवटच्या माणसाची कुणबी नोंद बघेपर्यंत ही कार्यवाही चालूच राहणार, असल्याचं महाजन यांनी सांगितलं. मंत्री उदय सामंत आणि संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, आरक्षण जाहीर करण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत पुढे ढकलण्यास जरांगे यांनी नकार दिला आहे. काल जालना इथे झालेल्या जाहीर सभेतही त्यांनी हीच भूमिका मांडली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत