महाराष्ट्रमुख्यपान

“उपरवाही ते गडचांदूर संविधान सन्मान पथमार्च”

रिपब्लिकन जागृती अभियान
संविधान दिनाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन
.

रविवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ ला स्थळ- ऐतिहासिक बुद्धभूमी येथे दुपारी ठीक ३: ३० वाजता विषय- २६ नोव्हेंबर २०२३ ला संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेण्याच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठक प्रा. रामराव पुणेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत प्रेमदास मेश्राम, अशोककुमार उमरे, सुरज उपरे, दिनेश गायकवाड, जगजीवन बोरकर, प्रभाकर खाडे, मदन बोरकर, रामदास रामटेके, भानुदास पाटील इत्यादींनी विषयाच्या अनुषंगाने आपापले विचार व्यक्त केले

जगजीवन बोरकर, पी. एफ. मेश्राम, नगरसेवक राहुल उमरे, मदन बोरकर, अशोककुमार उमरे, प्रा. रामराव पुणेकर, कल्याणी देवगडे, पुनम जुल्मे, शुद्धलेखा खाडे, शकुंतला जुमडे, विकास जुमडे, चेतना खाडे, भानुदास पाटील, रामचंद्र सोनटक्के, नितेश रामटेके, विठ्ठल कोठारे, गोविंदा इंगोले, जगदीश धवने, चिंतामणी घुले, उमाकांत वाघमारे, सुरज उपरे, दिनेश गायकवाड, रामदास रामटेके, अशोक गजभिये, रमेश खाडे, हंसराज ताकसांडे, देवराव भगत, नामदेव लांडगे

ठराव:-
१) २६ नोव्हेंबर २०२३ ला “उपरवाही ते गडचांदूर संविधान सन्मान पथमार्च” संविधान सन्मान रॅली प्रत्येक खेड्यातून काढून ती गडचांदूर येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीची सांगता करण्यात यावी.
२) रॅलीची सांगता झाल्यावर भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा.
३) संविधान दिनाचे महत्त्व विषद करण्यासाठी वक्त्यांचे मार्गदर्शनपर भाषणाचा कार्यक्रम.
४) गायिका बोरकर यांचा संविधानावर गीत गायनाचा कार्यक्रम.
५) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि दी बुद्धीस्ट सोसायटी आॉफ इंडिया या बाबासाहेबांच्या तिन्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न.

बैठकीची भुमिका व सुत्रसंचालन बैठकीचे निमंत्रक अशोककुमार उमरे यांनी विषद केली. बैठकीचे आभार प्रदर्शन भानुदास पाटील यांनी केले. बैठकीला या परिसरातील आंबेडकरी चळवळीतील बरेच अनुयायी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!