शिक्षण हे सक्षम नागरिक घडविण्याचे साधन.
शिक्षण हा मुलांना मिळालेला मूलभूत अधिकार असून तो हिरावण्याचा सरकारने प्रयत्न करू नये. शैक्षणिक क्षेत्र उत्पन्नाचे साधन नसून त्यातून देशाचे सक्षम नागरिक घडतात, हे सरकारने लक्षात घ्यावे. म्हणून शिक्षक व पत्रकारांनी बोलले पाहिजे तरच ही लोकशाही जिवंत राहील. शाळा टिकतील अन्यथा शाळा बंद पडतील आणि आजची | शिक्षकांची पिढी शेवटची पिढी ठरेल, असा गंभीर इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिला.
शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने आयोजित गुणवंत पत्रकार, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत कर्मचारी पुरस्कार | वितरण सोहळ्यात १६ गुणवंतांना सन्मानचिन्ह, शाल, बुके देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार शिंदे बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. याप्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव, जैन गुरुकुल प्रशालेचे प्राचार्य आशुतोष शहा, उज्ज्वला साळुंखे, मातोश्री रुक्मिणी भालशंकर, महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, बाळासाहेब डोळसे राज्य संघटक अशोक पाचकुडवे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हा सचिव रवी देवकर, दिव्यांग विभागप्रमुख विजयकुमार लोंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. भालशंकर म्हणाले, सकारात्मक विचार पेरत शिक्षक व कर्मचारी यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात संघटना खंबीरपणे उभी आहे. ठेकेदारामार्फत कंत्राटी भरतीला संघटना प्रखरपणे विरोध करील. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन जिल्हा सचिव रवी देवकर यांनी करून घेतले. सत्कारमूर्तीच्यावतीने शिवाजी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. याच समारंभात
संघटनेचे सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारंभाचे प्रास्ताविक संघटनेचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले यांनी केले तर दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद भालशंकर, प्रा. अभिजित भंडारे, सत्यवान पाचकुडवे, आसिफ कंदलगावकर, शुभम इंगळे, सुरेश कोरे, इरफान शेख आदींनी परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत