महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठविदर्भशैक्षणिक

नवे शैक्षणीक धोरण हे विवेकवादी असावे! पीपल्स पॅन्थर


मिशन ‘लोकराष्ट्र’ अंतर्गत कार्यकर्ता चर्चा सत्र आमदार निवास येथे घेण्यात आले.शिक्षण हे मानवतावादी,विज्ञानवादी व विवेकवादी असायला पाहीजे परंतू नवे शैक्षणिक धोरण हे चार्ल्स डार्विण चा सिध्दांतवाद नाकारून मनुस्मृती चे धडे अभ्यासक्रमात घालण्याचे मनसुबे रचले जात आहेत.हे विवेकाला व विज्ञानाला नाकारणारे आहे.असे शैक्षणिक धोरण ताबडतोब बंद करून,विध्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला पाहीजे,तरच लोकराष्ट्र निर्माण करण्यात त्यांचा हातभार लागेल. असे मत पीपल्स पॅन्थर चे अध्यक्ष डाॅ भीमराव मस्के यांनी व्यक्त केले.संविधान बदलून ,मनुचे राष्ट्र लादण्याचे षडयंत्र हाणून पाडावे व आरक्षण कायम ठेवण्याचे प्रयत्न केले पाहीजे,असे पॅन्थरचे सल्लागार एड.एल के मडावी म्हणाले .चर्चेत सहभागी होतांना प्रमोदभाऊ मुन म्हणाले की, सरकारने नव्या संसदेत शेंगोल बसवून विषमतेचे राष्ट्र निर्माण केले ते हटविल्या शिवाय लोकशाहीला अर्थ उरणार नाही.

आमचे प्रश्न मानव निर्मित असून भुतकाळातील फळे भोगत आहोत म्हणून न्याय हक्का करीता संघटना बांधून पॅन्थर ने दरारा निर्माण करावा. माथाडी कामगार नेते डाॅ हरिष धुरट म्हणाले की,आता महिला भट बनत आहेत त्याचेकडून महिलांना पुजा करून घ्यावी लागेल तर महीला विवेकवादी कशा होणार ,त्यांना पुजा,अर्चेत गुंतवून ठेवले तर त्यांची सर्वांगीक प्रगती कशी होणार?असा प्रश्न निर्माण करून ,आता तर सरकारने स्त्रि असो की पुरूष यांना कामाचे 12 तास केले आहे,न्याय मिळणे अवघड झाले आहे त्याकरीता पीपल्स पॅन्थरला पुढे यावे लागेल.आर एस वानखेडे म्हणाले,धर्मामधे शोषणाच्या प्रथा आहेत,जातीआहेत,त्या मोडल्या पाहीजेत.भारतामधे स्त्रि राष्ट्रपती होऊन देखील तिला पुजेचा अधिकार नाही ,याकरीता आवाज ऊठवावा लागेल थांबलेली चळवळ पुन्हा नव्या जोमाने ऊभी करावी लागेल.

र्शैक्षणिक धोरणावर चर्चा करतांना ,सरकारला धारेवर धरून निवृत शिक्षण अधिकारी निलेश पाटील म्हणाले की,नवे शिक्षण धोरण हे अंधश्रध्दा व बेकारीला निमंत्रण देणारे ठरणार आहे त्याकरीता संघर्ष करावा . माझा पॅन्थर मधे सहभाग राहील. नीट परीक्षेचा घोळ झाला,विध्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद झाले अशा सरकारला ताळ्यावर आणले पाहीजे असे शेषराव गणवीर म्हणाले. पॅन्थर महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता घोडे यांनी चर्चा करतांना,बेकारीमुळे माणूस व्यसनाधिन झालेला आहे.त्याला माणूस बनवावे लागेल.त्याकरीता महिलांनी पुढाकार घ्यावा.बैठकीचा समारोप पॅन्थर प्रदेश कार्याध्यक्ष गोविंदभाऊ मेश्राम यांनी केला.या बैठीला शहराध्यक्ष विनोदभाऊ मेश्राम,वर्धा जिल्हाध्यक्ष मधुभाऊ ओरके,सचिव बंडुभाऊ कदम,एड.सतिश वानखेडे,अरूणभाऊ प्रधान,अविनाश गायकवाड, वर्धा श्रिरंग मदनकर,,नागपूर ग्रा.सरचिटणीस डाॅ.विजय शेळके,डाॅ. प्रदीप मेश्राम,,भाऊ मस्के ,ताराचंद्र लोखंडे,,डाॅ.प्रतिभा मस्के,शैला जवादे ,गुलशन बोडखे,दिपक गौर,इत्यादी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!