संरक्षण मंत्रालय देशभरात 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित ?

प्लॉस्टिक कचरा हटवणं तसंच आसपासच्या भागात स्वच्छता राखण्याकरता जनतेमध्ये जागरुकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त संरक्षण मंत्रालय देशभरातील 400 हून अधिक ठिकाणी व्यापक स्वच्छता कार्यक्रम आयोजित करणार. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्ली इथं मुख्य कार्यक्रमाचं उद्धाटन करतील. या कार्यक्रमात पथनाट्य, चर्चासत्र, प्रश्नमंजूषा, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. या माध्यमातून पर्यावरणावर होणार्या प्लॉस्टिकच्या दुष्परिणामासंबंधी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत