आदरनीय डॉ सीमाताई साखरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित


आंबेडकरवादी महिला संघ ग्रूप तसेच आंबेडकराईट हेल्प ग्रूप तर्फे २४/०३/२०२४ ला महिला दिन /महाड संगर दिन या दिवसांचे औचित्य साधून आंबेडकराईट मुव्हमेंट मधील अतिशय प्रखर, प्रभावी आज ९७ वर्षांच्या काळातही तितकेच खमके व्यक्तिमत्त्व असलेल्या आदरनीय डॉ सीमाताई साखरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या वक्तव्यात सीमाताई म्हणाल्या, “बाबासाहेबांनी दिलेल्या माणूसपणाच्या प्रेरणेमूळेच आज आपण इथे आहोत. मी माणूस आहे म्हणून माणूसपणाने प्रामाणिकपणे जगावे हीच माझी जिद्द. माणूसकीचे अधिकार हवे असतील तर ते सहजासहजी मिळणार नाही म्हणून संघर्ष तर करावाच लागेल. मारकुंड्या ताई, भांडखोर ताई अशी माझी ओळख होती कारण पत्नीला मारणाऱ्या पुरूषाचा हाथ थरून त्याच्या पत्नीला मारायला मी सांगत होते. प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांना दिल्लीला भेटायला जायचे तेव्हा नेहरू आपली मुलगी इंदिरा ला सांगायचे, ‘देख इंदू तूम्हे इनके जैसा बनना है!’ (आमची मैत्रिण उज्वला गणवीर यांना सीमाताईंनी सांगितलेली आठवण) तर अशा या साहसी, निडर, प्रतापी ताईंना काल भेटण्याची आणि प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी पर्वणीच होती.
आंबेडकरी चळवळीतील एक अष्टपैलू व्यक्तीत्वाचे धनी असलेले आदरणीय प्रा. रणजित मेश्राम सर आपले प्रमुख वक्ता म्हणून विचार व्यक्त करतांना म्हणाले,
‘तत्वज्ञान जेव्हा वास्तव्यात जन्माला येते तेव्हा क्रांतीचा जन्म होतो. डाॅ बाबासाहेब आंबेडकर सुध्दा विकसित होत गेले, प्रक्रियेने घडत गेले. डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्तृत्व उलगडून दाखवित रणजित सर म्हणाले, काल आणि उद्याचा हा संगर आहे जो आज ला ओढून नेत आहे. आपण उद्याचे पक्षधर आहोत. आपला विषय पुतळा, स्मारक हा नाही आहे तर बाबासाहेबांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाच्या पोकळीतून आपल्या तावून सुलाखून निघायचे आहे. त्या वाटेवर स्वार व्हायचे आहे.आंबेडकरी चळवळ म्हणजे चालती पाऊले.. तो अभ्यासक्रम आहे.. तसेच ते घ्यावे.. दैवतीकरणाकडे जाणार नाही ती काळजी घ्यावी.. १९३० ला बाबासाहेबांनी राऊंड टेबल कान्फरन्स ला मिळालेले निमंत्रण हे तूमच्या आमच्या जीवनाचे प्रथम यश आहे. दास्यत्वातून मुक्ततेची प्रोसेस डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रातून मिळते असेही रणजित सर म्हणाले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या वक्ता बहुमुखी प्रतिभेच्या धनी आदरनीय डॉ विशाखा कांबळे मॅडम म्हणाल्या, पुरूषाविरोधातील लढा असे महिला दिनाबद्दल बोलले जाते पण तसे नाही. आपल्या विरूध्दचे दुसरे टोक पुरूष नसावा. पहिला महामानव तथागत बुध्द, त्यानंतर सम्राट अशोक, महात्मा फुले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर सर्व पुरूष च होते तरीही ते स्त्रीयांसाठी लढले. मानवी या शब्दातच विश्वकल्याण आलेले आहे म्हणून आपण पहिले माणूस व्हायला पाहिजे.
शिक्षणामुळे आपल्यात धार निर्माण होते आणि ही धार लेखणीची असावी’ असेही विशाखा मॅडम म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संबुध्दा महिला संघटनेच्या आदरणीय छायाताई खोब्रागडे होत्या. आंबेडकरी चळवळीशी पुरक असे विचार ताईंनी व्यक्त केले. या प्रोग्राम मध्ये आंबेडकरी मुव्हमेंट शी संबधित क्रियाशील, सक्रिय आणि समाजाला योगदान देणाऱ्या काही महिलांनाही सन्मानित करण्यात आले.
पुष्पाताई बौध्द, तक्षशिला वाघधरे,रंजनाताई वासे, संध्याताई राजूरकर, कल्पना मेश्राम, अॅड स्मिता कांबळे अशा कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशीलाने करण्यात आली. संविधान प्रास्ताविकेचे वाचन करूणा मून यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका सरिता सातारडे यांनी मांडली. कार्यक्रमातील पाहुण्यांचा परिचय अनुक्रमे प्रा. प्रज्ञा मेश्राम, सविताताई धामगाये, प्रतिभा सहारे यांनी केला आणि कार्यक्रमाचे बहारदार तितकेच प्रभावी संचालन उज्वला गणवीर यांनी केले.. आणि आभारप्रदर्शन करूणा मून यांनी केले.
अत्यंत अल्पावधीत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला असला तरी या कार्यक्रमाला आपल्या तनमनधनाने सहयोग करणाऱ्या आपण सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद.
विनीत
आंबेडकरवादी महिला संघ ग्रूप.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत