
तू पुन्हा येवू नको !
(अधिवेशन भैरवी)
कालच्या घनघोर थापा,
आणखी देऊ नको..
तू पुन्हा येवू नको !! धृ !!
ऐकल्या साऱ्या बढाया,
सारे तमाशे पाहिले
गाय गेली, जॉब गेला,
काय बाकी राहिले
जीव उरला एक माझा,
तो तरी घेऊ नको..
तू पुन्हा येऊ नको !!१!!
देव तुमचे, धर्म तुमचा,
हेच होते वाचले
का तरीही उद्धवाच्या
खालून पाणी साचले ?
बुच आधी लाव बाबा,
ते.. खुले ठेवू नको..
तू पून्हा येवो नको !!२!!
शिक्षणाशी वैर का रे ?
नीट थोडा वाग ना
माझियासाठी प्रभूला
कामधंदा माग ना..!
राज्य हे खड्ड्यात भाऊ
आणखी नेवू नको
तू पुन्हा येऊ नको !!३!!
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर ०३/०७/२०१९
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत