
देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति मेट्रीक टन ८०० अमेरिकन डॉलर निश्चित केलं आहे. किलोमागे ६७ रुपये असा हा दर येतो. उद्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत हे दर लागू राहतील. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं आज यासंदर्भातलं पत्रक प्रसिद्ध केलंय. याशिवाय आणखी २ लाख टन कांदा खरेदीची घोषणा सरकारनं केली आहे. यापूर्वी ५ लाख टन कांद्याची खरेदी सरकारनं केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत