
मलेशियामध्ये होत असलेल्या अकराव्या सुलतान करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने काल यजमान मलेशियाला ३-१ असे पराभूत करत विजय नोंदवला.भारतीय संघातल्या आदित्य लालगे,अमनदीप लाक्रा आणि रोहित यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.तर मलेशियाच्या सुहैमी इरफान शाहमीने एकमेव गोल केला. या विजयामुळे भारत ब गटात अव्वल स्थानावर आहे. भारताचा सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध ३-३असा बरोबरीत सुटला होता.भारताचा पुढचा सामना उद्या न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत