अजितदादा सार्वजनिक कार्यक्रमांपासून अचानक दूर, प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेना-भाजपमध्ये सहभागी झाल्यापासून चर्चेत आहे. अधूनमधून अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत असतात. आता पुन्हा अजित पवार दोन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाही. यामुळे चर्चा सुरु झाली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते शनिवारी होणार होता. परंतु मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाणे टाळले. रविवारी ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाही. त्याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्या असल्याचे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत