मराठा समाज आरक्षण सर्व्हे मध्ये जात गणनेत बौध्द खुल्या प्रवर्गात, गणनेच्या आकडेवारीत ऑनलाईन घोळ!मागासवर्ग आयोगास वंचित आघाडीचीतक्रार…

राजेन्द्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश.
9422160101
अकोला, दि. २४ –
आज पासून मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात सरकारने प्रत्येक घरी जाऊन ‘सर्वेक्षण’ सुरू केले आहे, यामध्ये मराठा समाज असल्यास जात व आर्थिक स्थिती संबंधित जवळपास १८२ प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.तथापि ह्या सर्व्हेक्षण करताना जातीचे यादी मध्ये ‘बौध्द’ नमूद नसल्याने राज्यात संतापाची लाट असून इतर सर्व जाती असताना ह्या ॲप मध्ये केवळ ‘महार’ जातीचा रकाना घालण्यात आला असून बौध्द नमूद केल्यास खुल्या प्रवर्गात समाविष्ट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
प्रगणकाने केवळ अठरा घराचा सर्व्हे केलेला असताना त्यात ५४ घराचा सर्व्हे केल्याची आकडेवारी येत असल्याने हा घोळ जाणीवपूर्वक बौध्द खुल्या प्रवर्गात टाकून ह्या आकडेवारीचा वापर राजकीय आरक्षण आणि लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणारे लाभ घालविण्यासाठी केला जाणार असल्याची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी राज्य मागासवर्ग आयोग आणि मुख्यमंत्री ह्यांना केली आहे.
मंगळवार (२३ जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.ह्या सर्वेक्षण मध्ये खुल्या प्रवर्गात असलेल्या जातीचा देखील सर्व्हे होत असल्याचे नमूद असून प्रगणकाना दिलेल्या ॲप मध्ये सर्व जातींची यादी असून केवळ बौध्द ही जात नमूद केलेली नाही.त्यात केवळ महार ही जात नमूद करण्यात आली असून मराठा कुणबी व्यतिरिक्त इतर सर्व जाती खुल्या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.ही अत्यंत गंभीर बाब आहे.ही गणना मराठा कुणबी समाजाची असेल तर मराठा कुणबी समाजाची आकडेवारी गोळा करायला ही गणना होने अभिप्रेत आहे.मात्र मागासवर्ग आयोग जाणीवपूर्वक खुल्या प्रवर्गात अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त, इतर मागास प्रवर्ग ह्यांची गणना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करून करीत आहे.२०२१ मध्ये जनगणना होवू शकली नाही.त्यामुळे ह्या आकडेवारीचा वापर करून अनुसुचित जाती जमाती व इतर आरक्षित समूहाचे राजकीय आणि नोकरी तसेच शिक्षणा मधील आरक्षण ह्या वर गदा आणली जाणार आहे.ही सदोष गणना रद्द करावी किंवा बौध्द हा रकाना अनुसूचित जाती साठी आणि इतर आरक्षित घटकाची नोंद करण्याची तरतूद करावी अशी मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
तसेच ह्या प्रगणेच्या आकडेवारी मध्ये देखील मोठा घोळ असून प्रगणकाने केवळ अठरा घराचा सर्व्हे केलेला असताना मोबाईल ॲप मध्ये चक्क ५४ दाखवीत आहे, ही गणना मोठा घोळ घालणारी असल्याने मराठा समाजाचे टिकणारे आरक्षण देताना मराठा समाजाची फसवणूक करणारी तसेच न्यायालयात टिकणारा नाही अशी फसवी गणना करू नये अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील युवा आघाडीचे वतीने देण्यात आला आहे.





संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत